रासायनिक खतामध्ये सर्वच घटक पोषक मात्रा नसते. त्यामध्ये असलेल्या पोषक मात्रेचे प्रमाण टक्क्यांमध्ये दर्शविलेले असते.
उदाहरणार्थ या गोणीवर ४६ % नत्र (N) असल्याचे दर्शविले आहे. याचा अर्थ १०० किलोच्या गोणीत ४६ किलो नत्र हे पोषक तत्व आहे. हे सरळ किंवा सिंगल रासायनिक खत आहे. कारण यात स्फुरद(P) आणि पालाश(K) नाही.
सरळ किंवा सिंगल रासायनिक खताची मात्रा काढण्यासाठी उदाहरण :
गव्हास पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 40 किलो नत्र देण्याची शिफारस केली आहे.
४० किलो नत्र देण्यासाठी किलो युरिया खत द्यावे लागेल हे पुढे दिलेल्या सूत्रानुसार काढावे.
प्रथम खतामध्ये असलेल्या प्रमाणास १०० ने भागावे.
४६ / १००=२.१७३
आलेल्या उत्तरास शिफारस केलेल्या मात्रेने गुणावे.
४० x २.१७३ = ८६.९२
याचा अर्थ प्रति हेक्टरी 40 किलो नत्र देण्यासाठी ८६.९२ किलो युरिया द्यावा लागेल.
कॉम्प्लेक्स रासायनिक खतात नत्र, स्फुरद आणि पालाश असे तीनही पोषक घटक असतात. पोषक तत्वांचे प्रमाण टक्केवारीत दिलेले असते.
१०:२६:२६ या कॉम्प्लेक्स रासायनिक खतात प्रत्येक १०० किलो मध्ये १० किलो नत्र, २६ किलो स्फुरद आणि २६ किलो पालाश हे पोषक घटक आहेत.
उदाहरण: उसाला २५० किलो नत्र, ११५ किलो स्फुरद व ११५ किलो पालाश या पोषक घटकांची मात्रा द्यायची आहे. त्यासाठी १०:२६:२६ याकॉम्प्लेक्स वापरावयाचे आहे.
प्रथम खतामध्ये असलेल्या प्रमाणास १०० ने भागावे.
२६ / १००=३.८४६
आलेल्या उत्तरास शिफारस केलेल्या मात्रेने गुणावे.
११५ x ३.३८६ = ४४२.३०
याचा अर्थ ११५ किलो स्फुरद आणि ११५ किलो पालाश मिळण्यासाठी १०:२६:२६ या प्रकारचे ४४२.३० किलो कॉम्प्लेक्स रासायनिक खत लागेल.
खताचे वजन x खतामध्ये असलेले प्रमाण
४४२.३० x १०= ४४२३.००
आलेल्या उत्तरास १०० ने भागावे.
४४२३.०० / १०० = ४४.२३
४४२.३० किलो १०:२६:२६ या रासायनिक खतापासून ४४.२३ किलो नत्र मिळणार आहे.
शिफारस केलेली २५० किलोची नत्राची मात्रा पूर्ण करण्यासाठी
२५० – ४४.२३=२०५.७७ किलो नत्र द्यावे लागेल.
हि नत्राची मात्रा युरिया द्वारे पूर्ण करण्यासाठी
प्रथम खतामध्ये असलेल्या प्रमाणास १०० ने भागावे.
४६ / १००=२.१७३
आलेल्या उत्तरास शिफारस केलेल्या मात्रेने गुणावे.
२०५.७७ x २.१७३ = ४४७.१३ किलो
उसासाठी हेक्टरी २५० किलो नत्र, ११५ किलो स्फुरद व ११५ किलो पालाश हि पोषक मात्रा असलेले रासायनिक खत द्यायचे असेल तर
४४२.३० किलो १०:२६:२६ आणि ४४७.१३ किलो युरिया द्यावा लागेल.


No comments:
Post a Comment