Wednesday, September 9, 2015

औषधी मेथी


मेथीच्या झाडांवर शेंगा येतात. त्या शेंगामधील बियांना मेथ्या म्हणतात.
हे दाने छोटे, हलके,पिवळ्या रंगाचे आणि चवीला थोडे कडवट असतात.
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी या मेथ्या गुणकारी आहेत.  मेथ्यामध्ये अमिनो असिड असते. हे अमिनो असिड पॅक्रीयाज मधील इन्सुलिनचा स्त्राव वाढवते.  यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तिच्यात अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने ती मधुमेह व उच्च रक्तदाब यांनाही प्रतिबंध करते.
एक मोठा चमचा (पन्नास ते साठ ग्राम) मेथीचे दाणे घेऊन त्यात दोन ग्लास पाणी रात्रभर भिजत घालावे. सकाळी हे पाणी गाळून प्यावे.
केसांच्या समस्येवर केस गळणे, केस पातळ होणे यासाठी मेथ्याचा खूप उपयोग होतो. यामध्ये असलेल्या निकोटिनिक एसिड मुळे केसांच्या मुळांचे पोषण होऊन मुळे मजबूत होतात.
केसांसाठी मेथ्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो.  त्यातील काही पारंपारिक पद्धती खालील प्रमाणे आहेत.
मेथ्या गरम पाण्यात उकळून घ्याव्यात.  त्यांची पेस्ट करावी. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावावी.
किंवा
मेथ्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात.  या मेथ्यांची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट तयार करावी. त्यामध्ये घट्ट दही किंवा एक मोठा चमचा लिंबू मिसळावे. हे मिश्रण केसांना वीस मिनिटे लावून केस स्वच्छ धुवून टाकावेत. असे महिनाभर केल्याने यामुळे केस मजबूत आणि   चमकदार होतात.  केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते.

चेहऱ्यावरील मुरुमे दूर करण्यासाठी एक छोटा चमचा मेथ्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात.  या मेथ्यांची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट तयार करावी.  त्यात पाव चमचा हळद एकत्र करून चेहऱ्याला लावावी. पंधरा मिनिटाने चेहेरा धुवून टाकावा.

मेथ्या किडनीच्या समस्येवर गुणकारी आहेत. किडनीस्टोन साठी हा परिणामकारक इलाज आहे.

वजन कमी करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजविलेल्या मेथ्या सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्यातील फायबर पोटात फुगल्याने पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक कमी लागते आणि जास्त खाण्यामुळे वजन वाढण्याची समस्या दूर होते.

मटकी प्रमाणे मोड आणलेल्या मेथ्याची भाजी चवदार लागते.  मेथ्यामधील कडवट चव निघून जाते. यासाठी मेथ्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. कोमट पाण्यात रात्रभर भिजत घालाव्यात. भिजविलेल्या मेथ्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्याव्यात. एक दिवस किंवा मोड येईपर्यंत ओलसर सुती कापडात बांधून ठेवाव्यात.

No comments:

Post a Comment