Tuesday, December 1, 2015

मन

मन सुद्धा एक पदार्थ आहे. पाण्यासारखा.  मन खऱ्या अर्थाने संवेदनशील असत जेव्हा ते पाहिलं जातं. मन तुम्हाला तो पर्यंत जाणवत नाही जो पर्यंत त्यात तरंग निर्माण होत नाही.  प्रत्येक तरंगाला एक अर्थ असतो. या तरंगाचा अर्थ स्पष्ट समजतो जेव्हा तो पहिला जातो. या मनात असंख्य आणि अगणित तरंग उमटत असतात की तुम्ही प्रत्येक तरंग पाहू शकत नाही. मन श्वासाधीष्टीत होत तेव्हा हे तरंग कमी होतात. प्रत्येक तरंग स्पष्ट दिसतो. त्याच्या अर्थ समजतो.  कारण तेव्हा हे मनरूपी पाणी शांत असत. हे तरंग पहाणं म्हणजे साक्षीभाव. तरंग रहित अवस्था पाहिली जाते तेव्हा ध्यान निर्माण होतं.  

Saturday, September 19, 2015

जगात कुठूनही करा तुमच्या संगणकावर काम.

संगणकावर Chrome Remote Desktop सेटअप करा आणि तुमचा संगणक जगात कुठूनही एॅक्सेस करा.
रिमोट डेस्कटॉप म्हणजे दूरवरील संगणकाचा डेस्कटॉप  नेटवर्क द्वारे वापरकर्त्याला त्याच्या संगणकावर  उपलब्ध होणे.
Chrome Remote Desktop हे सॉफ्टवेअर टूल गूगल कंपनीने  डेव्हलोप केले असून मोफत उपलब्ध आहे.
या टूल मुळे दूरस्थ संगणकाचा डेस्कटॉप गुगल वेब ब्राउजर द्वारे वापरकर्त्याला कीबोर्ड आणि माउस द्वारे वापरण्यास उपलब्ध होतो.  एॅक्सेस झालेला डेस्कटॉप दोन्ही संगणकावरील युजर शेअर करू शकतात.
यासाठी दोन्ही संगणकावर  गुगल वेब ब्राउजर आणि इंटरनेट कनेक्शन सुरु स्थितीत असणे आवशयक आहे. दोन्ही संगणकांवर Chrome Remote Desktop स्थापित असणे आवश्यक आहे.






Thursday, September 17, 2015

mnemonics म्हणजे काय?

तुम्ही जरा इंद्रधनुष्याचे सात रंग सांगा.  इग्रजीत सांगा. अनुक्रमाणेच सांगा. 
सांगता आले तर छान.  नाही आले तर खूपच छान.  कारण आता ROY G BIV नावाची व्यक्ती तुम्हाला ते कधीच विसरू देणार नाही. फक्त त्याचे नाव स्पेलिंग सहित लक्षात ठेवा.  गुगल वर तुम्ही mnemonics असा शब्द सर्च कराल तर शक्यता आहे कि सगळ्यात प्रथम ROY G BIV भेटतील.
RED,  ORENGE, YELLOW,
GREEN,
BLUE, INDIGO, VIOLET
ROY G BIV स्मृतीसहाय्यक शब्द आहे.
Mnemonics म्हणजे शिकलेले लक्षात ठेवण्यासाठी वापरलेले तंत्र. 
 विषय कुठलाही असू द्या, वेगवेगळ्या स्मृतीसहाय्यक तंत्रामुळे तो सोपा होतो.




Wednesday, September 9, 2015

औषधी मेथी


मेथीच्या झाडांवर शेंगा येतात. त्या शेंगामधील बियांना मेथ्या म्हणतात.
हे दाने छोटे, हलके,पिवळ्या रंगाचे आणि चवीला थोडे कडवट असतात.
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी या मेथ्या गुणकारी आहेत.  मेथ्यामध्ये अमिनो असिड असते. हे अमिनो असिड पॅक्रीयाज मधील इन्सुलिनचा स्त्राव वाढवते.  यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तिच्यात अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने ती मधुमेह व उच्च रक्तदाब यांनाही प्रतिबंध करते.
एक मोठा चमचा (पन्नास ते साठ ग्राम) मेथीचे दाणे घेऊन त्यात दोन ग्लास पाणी रात्रभर भिजत घालावे. सकाळी हे पाणी गाळून प्यावे.
केसांच्या समस्येवर केस गळणे, केस पातळ होणे यासाठी मेथ्याचा खूप उपयोग होतो. यामध्ये असलेल्या निकोटिनिक एसिड मुळे केसांच्या मुळांचे पोषण होऊन मुळे मजबूत होतात.
केसांसाठी मेथ्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो.  त्यातील काही पारंपारिक पद्धती खालील प्रमाणे आहेत.
मेथ्या गरम पाण्यात उकळून घ्याव्यात.  त्यांची पेस्ट करावी. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावावी.
किंवा
मेथ्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात.  या मेथ्यांची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट तयार करावी. त्यामध्ये घट्ट दही किंवा एक मोठा चमचा लिंबू मिसळावे. हे मिश्रण केसांना वीस मिनिटे लावून केस स्वच्छ धुवून टाकावेत. असे महिनाभर केल्याने यामुळे केस मजबूत आणि   चमकदार होतात.  केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते.

चेहऱ्यावरील मुरुमे दूर करण्यासाठी एक छोटा चमचा मेथ्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात.  या मेथ्यांची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट तयार करावी.  त्यात पाव चमचा हळद एकत्र करून चेहऱ्याला लावावी. पंधरा मिनिटाने चेहेरा धुवून टाकावा.

मेथ्या किडनीच्या समस्येवर गुणकारी आहेत. किडनीस्टोन साठी हा परिणामकारक इलाज आहे.

वजन कमी करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजविलेल्या मेथ्या सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्यातील फायबर पोटात फुगल्याने पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक कमी लागते आणि जास्त खाण्यामुळे वजन वाढण्याची समस्या दूर होते.

मटकी प्रमाणे मोड आणलेल्या मेथ्याची भाजी चवदार लागते.  मेथ्यामधील कडवट चव निघून जाते. यासाठी मेथ्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. कोमट पाण्यात रात्रभर भिजत घालाव्यात. भिजविलेल्या मेथ्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्याव्यात. एक दिवस किंवा मोड येईपर्यंत ओलसर सुती कापडात बांधून ठेवाव्यात.

Tuesday, September 8, 2015

पिकांना द्या खतांची योग्य मात्रा

रासायनिक खतामध्ये  सर्वच घटक पोषक मात्रा नसते.  त्यामध्ये असलेल्या  पोषक मात्रेचे प्रमाण टक्क्यांमध्ये दर्शविलेले असते. 


उदाहरणार्थ या गोणीवर ४६ % नत्र (N) असल्याचे दर्शविले आहे.  याचा अर्थ १०० किलोच्या गोणीत ४६ किलो नत्र हे पोषक तत्व आहे.  हे सरळ किंवा सिंगल रासायनिक खत आहे.  कारण यात स्फुरद(P) आणि पालाश(K) नाही.

सरळ किंवा सिंगल रासायनिक खताची मात्रा काढण्यासाठी उदाहरण :
गव्हास पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 40 किलो नत्र देण्याची शिफारस केली आहे.

४० किलो नत्र देण्यासाठी किलो युरिया खत द्यावे लागेल हे पुढे दिलेल्या सूत्रानुसार काढावे.

प्रथम खतामध्ये असलेल्या प्रमाणास १०० ने भागावे.
४६ / १००=२.१७३
आलेल्या उत्तरास शिफारस केलेल्या मात्रेने गुणावे.
४० x २.१७३ = ८६.९२

याचा अर्थ  प्रति हेक्‍टरी 40 किलो नत्र देण्यासाठी ८६.९२ किलो युरिया द्यावा लागेल.
  
कॉम्प्लेक्स रासायनिक खतात नत्र, स्फुरद आणि पालाश असे तीनही पोषक घटक असतात.  पोषक तत्वांचे प्रमाण टक्केवारीत दिलेले असते.  

१०:२६:२६ या कॉम्प्लेक्स रासायनिक खतात प्रत्येक १०० किलो मध्ये १० किलो नत्र, २६ किलो स्फुरद आणि २६ किलो पालाश हे पोषक घटक आहेत.


उदाहरण: उसाला २५० किलो नत्र११५ किलो स्फुरद व ११५ किलो पालाश या पोषक घटकांची  मात्रा द्यायची आहे. त्यासाठी १०:२६:२६ याकॉम्प्लेक्स वापरावयाचे आहे.

प्रथम खतामध्ये असलेल्या प्रमाणास १०० ने भागावे.
२६ / १००=३.८४६
आलेल्या उत्तरास शिफारस केलेल्या मात्रेने गुणावे.
११५ x ३.३८६ = ४४२.३०

याचा अर्थ ११५ किलो स्फुरद आणि ११५ किलो पालाश मिळण्यासाठी १०:२६:२६ या प्रकारचे ४४२.३० किलो कॉम्प्लेक्स रासायनिक खत लागेल.

४४२.३० किलो १०:२६:२६ या प्रकारच्या खतात नत्राचे प्रमाण पुढील प्रमाणे काढावे.
खताचे वजन x खतामध्ये असलेले प्रमाण
४४२.३० x १०= ४४२३.००
आलेल्या उत्तरास १०० ने भागावे.
४४२३.०० / १०० = ४४.२३

४४२.३० किलो १०:२६:२६ या रासायनिक खतापासून ४४.२३ किलो नत्र मिळणार आहे.

शिफारस केलेली २५० किलोची नत्राची मात्रा पूर्ण करण्यासाठी
२५० – ४४.२३=२०५.७७ किलो नत्र द्यावे लागेल.

हि नत्राची मात्रा युरिया द्वारे पूर्ण करण्यासाठी
प्रथम खतामध्ये असलेल्या प्रमाणास १०० ने भागावे.
४६ / १००=२.१७३
आलेल्या उत्तरास शिफारस केलेल्या मात्रेने गुणावे.
२०५.७७ x २.१७३ = ४४७.१३ किलो

उसासाठी हेक्टरी २५० किलो नत्र११५ किलो स्फुरद व ११५ किलो पालाश हि पोषक मात्रा असलेले रासायनिक खत द्यायचे असेल तर
४४२.३० किलो १०:२६:२६ आणि ४४७.१३ किलो युरिया द्यावा लागेल.